बुधवार, ३ जून, २०२०

Rainy Love story

सकाळी अगदी मोकळं आकाश असल्यामुळे आरव आज त्याची लाडकी मैत्रीण अर्थातच त्याची बाईक घेऊन ऑफिसला आलेला मात्र दुपारनंतर आभाळ भरून आलं. असा झूम पोहोचू घरी पाऊस कसला गाठतो मला, आरव मनातल्या मनात बोलला आणि निघाला..
पाऊसच तो , असा थोडीच कोणाला सोडणार आहे! खरतर आरव सारख्या पाऊसवेडयाने मनसोक्त भिजतच जायला हवा घरी मात्र पुन्हा आजारी पडलो तर आईचा ओरडा शिवाय ऑफिसला दांडी ती वेगळीच त्यामुळे हा थांबला एका ओडोश्याला.
रेवाची परिस्थिती काही वेगळी नव्हती. रेनकोट नाही छत्री नाही असे कसे आलो आपण! असे ती स्वतःच्याच बेजबाबदारपणाला दूषण देत होती.
हा इथे थांबवते, रेवा पण थांबली. नेमकी आरवच्या एकदम समोर गाडी आली. मात्र त्याच्या अंगावर पाणी उडाले..
चिंब करणारा हा पाऊस पाहून आरव पूर्ण हरखून गेला होता..
एकदम तो भानावर आला आणि ओरडला अरे काय समजत की नाही तूला असे direct अंगावर गाडी घालते हा..  ड्रेस खराब झाला माझा!!
तो ड्रेस साफ करत करत बडबडत होता आणि रेवा ती तर त्याच्याकडे नुसती बघत होती. समोरून काहीच प्रतिसाद आला नाही तसा आरव ने वर पाहिले आणि तो जवळजवळ ओरडलाच रेवा तू .. अरे कुठे होतीस कॉलेज संपल तर मैत्री पण संपते काय!!
रेवा अजूनही तहीच पावसात भिजत आरवकडे बघत होती.आरव ने तिचा हात धरला आणि तिला ओढले “ वेडू भिजतेय ना तू!!”  रेवा भानावर आली. ओले झालेले हात ती पुसू लागली आणि आरव तिच्या त्या लोभस रुपाकडे बघत होता.. होतीच तशी ती, उठावदार नाक, सुबक डोळे आणि थोडी कमी उंची पण काळेभोर बोलके डोळे आरव ला कॉलेज मध्ये असल्यापासून मोहिनी घालत होते मात्र तेव्हा मैत्रीच्यावरती त्याने कधी विचारच केला नाही. रेवाला मात्र तो तेव्हापासूनच आवडायचा! तोही तिच्या पुढेमागे करायचा त्यामुळे तिला वाटले हा आज ना उद्या करेल प्रपोझ.. पण असे काही झालेच नाही आणि जे ते ज्याच्या त्याच्या वाटेने करिअर ला लागले.

कॉलेज मधली ती मस्ती,ते महिन्याला भेटण्याचे प्रॉमिसेस, त्या ठरवलेल्या short picnic, आणि अजून बराच काही कॉलेज बरोबरच थांबलं होत. त्यामूळे रेवा- आरव ची भेट होण्याचे काही कारणच नव्हते. पण कॉन्टॅक्ट ठेवता आला असता पण फक्त मित्र म्हणून राहणे शक्य नव्हतेच रेवा साठी त्यामुळे तिने संपर्क नाही ठेवला.
आज दोन वर्षांनी जरी रेवा आरवला पाहत असली तरी तिच्या feelings नव्हत्या बदलल्या.
बाहेर वीज कडाडली आणि दोघेही भानावर आले.
पाऊस अजूनही बरसतच होता.  “अरे हे जॉब आणि घर वेळच नाही भेटत” काहीतरी बोलायचे म्हणून रेवा बोलली.
आरव ने मघाशी धरलेला हात अजून सोडलाच नव्हता.त्याने तिला आणखी जवळ ओढले आणि बोलायला लागला , खरच इतकी busy झालीस की माझी आठवण पण नाही आली कधी?
त्याच्या इतक्या बोलण्यातच रेवा विरघळली क्षणात तिचे ते काळेभोर डोळे आभाळासारखे भरून आले ,तू पण तर कधी contact नाही केलास रे !!
तसा आरव ओशाळला.त्याला स्वतःलाच कधी मनातल्या भावना समजलेल्या नव्हत्या तर तो तिच्यापुढे काय व्यक्त होणार.पण याक्षणी त्याला ती अगदी अशीच जवळ राहावी वाटत होती आणि हा पाऊस थांबूच नये असे वाटत होते. असे का होतेय मला ,आरव विचार करू लागला. खूप दिवसांनी मैत्रीण भेटली म्हणून असेल त्याने स्वतःची समजूत घातली.
रेवाला मात्र नशिबाने घडवून आणलेली ही भेट फुकट नव्हती घालवायची तिने त्याला विचारले ,लग्न झाले की नाही ? तसा आरव हसला ,अरे इतक्यात नाही अजून काही वर्षे तर फक्त करिअर.  तुझे काय ? 
माझे ठरतेय आता एक मुलगा पहिलाय मला आवडलाय ! बघू आता त्याला मी आवडते काय ते.. रेवाने गुगली टाकली.
तिच्या या वाक्यसोबतच मोठ्याने वीज कडाडली आणि आधीच जवळ असलेली रेवा त्याला बिलगली. पावसाने आणखी जोर घेतला आणि आरवच्या विचारांनी सुद्धा. 
हेच होत ते,जे मला हवं होतं . मघापासून मला ही इतक्या जवळ हवी होती..
पण का! इतक्या मैत्रिणी आहेत आपल्याला हीच का हवी असते जवळ.कधी भावनांचा उद्रेक झाला की रेवाच आठवते. ऑफिस वरून निघताना हा पाऊस आला तेव्हा पण तर त्याला रेवाला पण पाऊस आवडतो हे आठवलेले..
आरव, अरे सोडतोस ना मला . आवाजाने घाबरले रे सॉरी,रेवा बोलली
आरवने थोडीसुद्धा मिठी ढिली नाही केली तसाच राहून तो बोलायला लागला.
कॉलेज मध्ये मी वेडा होतो ना रेवा! अशी गोड मैत्रीणीला प्रेयसी करावे हे पण नाही समजले मला..
तुझ्या मनातल्या भावना नाही समजल्या मला.अग माझ्या मनातल्या तरी कुठे समजल्या मला..
ऐक तुला जो मुलगा आवडलाय ना त्याला तू आधीपासूनच आवडतेस. I Love U Reva!! आरवने गुडघ्यावर बसून रेवाला अगदी filmi style ने प्रपोज केले. आज प्रथमच रेवाला लाजताना पाहून आरव हरखून गेला. त्याने हळूच त्याचे ओठ तिच्या गालांवर टेकवले. 
इतक्या दिवसांनी तिला तिचा राजकुमार भेटला होता.एव्हाना पाऊसही थांबला होय. तिने त्याचा हात धरला आणि दोघे चालायला लागले . एका सहजीवनाच्या सुंदर प्रवासासाठी.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा